Thursday, August 16, 2018

महादुर्गेश्वर प्रपत्ती (Mahadurgeshwar Prapatti)

काल रात्री ऑफिस आटपून मी साधारणपणे 9 वाजता बोरिवली (प) केन्द्रावरील प्रपत्ती च्या ठिकाणी पोचलो, थोडा उशीर झाल्याने मला वाटलं कि माझी आजची प्रपत्ती चुकणार, पण तस झाल नाही, उलट जास्तकरून श्रद्धावान ऑफिस संपवून येणार असल्याकारणाने ठरल्या वेळेपेक्षा थोडी उशिरा प्रपत्ती सुरु होणार असल्याचे कळले व खूप बरे वाटले. हॉल वर एकदम friendly व relaxed वातावरण होतं. मी शांतपणे पूजनाची थाळी घेतली (जी प्रत्येक श्रद्धावानांसाठी केंद्रानेच अरेंज केली होती), व चण्डिकाकुलाच्या तसबिरीसमोर जाऊन बसलो. बरोबर बरेच श्रद्धावान होते. ​

थोड्यावेळाने अजून काही श्रद्धावान आल्यावर प्रपत्ती सुरु झाली, प्रपत्तीच्या आधी सदगुरु बापूंनी प्रपत्ती बद्दल जी माहिती सांगितली होती तो रामराज्य प्रवचनातील व्हिडीओ दाखवण्यात आला. साहजिकच प्रपत्ती आपण का करायची ते मनात परत ठसले गेले. हि प्रपत्ती - मग ती मंगलचण्डिका प्रपत्ती असो वा रणचण्डिका प्रपत्ती (महादुर्गेश्वर प्रपत्ती) हि प्रत्येक श्रद्धावानाला शौर्य प्रदान करते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यास समर्थ बनवते, हे बापूंचे शब्द कानात गुंजत होते, ह्यामुळे प्रपत्ती करताना आपण ती का करतो आहोत हे प्रत्येक क्षणी जाणवत होतं. अतिशय सुंदर पद्धतीने पवित्र वातावरणात संपूर्ण प्रपत्ती पार पडली.

"बं बं भोलेनाथ, बं बं भोले" हा गजर देखील अतिशय सुंदर व अनोख्या चालीत घेतला गेला, व प्रत्येक श्रद्धावानाने १२ प्रदक्षिणा झाल्यानंतर त्रिविक्रमाला फुले व अक्षता अर्पण करून लोटांगण घालून नमस्कार केला. प्रपत्ती च्या हॉल वर खूपच प्रसन्न वातावरण होते.
एवढ्या सुटसुटीतपणे सर्व गोष्टी मॅनेज करणाऱ्या ऑर्गनायझिंग टीम ला खूप अंबज्ञ, आणि प्रपत्ती सारखी एकत्र येऊन करण्याची जल्लोष करण्याची गोष्ट दिल्याबद्दल आपल्या लाडक्या बापुंना व मोठ्या आईला देखील खूप खुप अंबज्ञ !!!

..... शंतनुसिंह नातु

No comments:

Post a Comment