Sunday, August 19, 2018

अँटी व्हायरस... (Antivirus)

अँटी व्हायरस.....

लँपटाँप घेताना मला सांगण्यात आले की त्याच्यावर अॅन्टीव्हायरस प्रोग्राम टाकून घे... देणारा माझा मित्रच होता...मी विचारले याची आवश्यकता का?

त्याने उत्तर दिले की आपला लॅपटॉपला आपण मोबाईल जोडतो किंवा मेमरी कार्ड जोडतो. कदाचित इंटरनेटचा वापर करताना सर्फिंग करताना अनेक हार्मफुल साईट्स असतात, छुपे व्हायरस असतात जे आपल्या नकळत आपल्या पी सी मधे येतात व सिस्टीम बिघडवतात.

मी विचारले समजा लॅपटॉप कशालाच जोडला नाही तर मग कसे येतील?

त्याने सांगितले की जोडावा तर लागतोच व समजा जोडला नाहीच तरी काही काळाने अनावश्यक फोल्डर वगैरे तयार होतात ते काढून टाकावे लागतात. काही प्रोग्राम अपडेट करावे लागतातच अपरिहार्य पणे जोडावा लागतोच. आपल्या नकळत व्हायरस येऊ शकतात. त्यासाठी अँटीव्हायरस असावाच व रोज अथवा ठराविक दिवसांनी पीसी स्कॅन करावा.

मी सर्व ऐकले व समजून घेतले...

वर वर अतिशय कॉमन दिसणारी ही गोष्ट मला बरंच शिकवून गेली...

एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे.

मी थोडा असा विचार केला...

जर एखादा छोटा लॅपटॉप ज्याची हार्ड डिस्क फार तर 512 जीबी वगैरे असते व तो इतरत्र कनेक्ट झाला तर हार्मफुल प्रोग्राम येतात व सिस्टीमवर हल्ला करतात.

मग मानवी मेंदू तर त्यातुलनेत प्रचंड मोठा आहे. तो ही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशान, काही दुषीत जागा, बाधीक व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती वगैरे च्या संपर्कात आपण जातो.

मग आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये (दोष येऊ नये आपले तेजोवलय दुषीत होऊ नये) म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो?

उत्तर समोरच होते...

आपण म्हणणारे स्तोत्र मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस... मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय... कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?

पण ज्याला समजते त्याने सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो... समजो अथवा न समजो ते काम तर व्यवस्थित होते.

मंत्र स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...

जसे सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पी सी असतात त्यांना स्ट्राँग अँटी व्हायरस लागतो... तसेच विशेष साधना करणार्‍या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावच लागतं.

एव्हाना पी सी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल...

त्या क्षेत्रातील तज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा एवढंच आपण करत रहावं मग चिंता नाही.

आणि दुर्लक्ष करत गेलो तर एकवेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं पण शरीराला, मनाला फॉर्मेट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी....

शेवटी काय?...

रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ, नित्यसेवा हार्मफुल साईट्सला भेट देताना आपलं संरक्षण, शुचिर्भूतता सांभाळली की आपलं शरीर, मन नक्कीच छान सुरक्षित राहील.

...... लेखक कोण माहिती नाही, पण खूप छान लेख...
..... (व्हॉट्सअप वरुन)

Thursday, August 16, 2018

महादुर्गेश्वर प्रपत्ती (Mahadurgeshwar Prapatti)

काल रात्री ऑफिस आटपून मी साधारणपणे 9 वाजता बोरिवली (प) केन्द्रावरील प्रपत्ती च्या ठिकाणी पोचलो, थोडा उशीर झाल्याने मला वाटलं कि माझी आजची प्रपत्ती चुकणार, पण तस झाल नाही, उलट जास्तकरून श्रद्धावान ऑफिस संपवून येणार असल्याकारणाने ठरल्या वेळेपेक्षा थोडी उशिरा प्रपत्ती सुरु होणार असल्याचे कळले व खूप बरे वाटले. हॉल वर एकदम friendly व relaxed वातावरण होतं. मी शांतपणे पूजनाची थाळी घेतली (जी प्रत्येक श्रद्धावानांसाठी केंद्रानेच अरेंज केली होती), व चण्डिकाकुलाच्या तसबिरीसमोर जाऊन बसलो. बरोबर बरेच श्रद्धावान होते. ​

थोड्यावेळाने अजून काही श्रद्धावान आल्यावर प्रपत्ती सुरु झाली, प्रपत्तीच्या आधी सदगुरु बापूंनी प्रपत्ती बद्दल जी माहिती सांगितली होती तो रामराज्य प्रवचनातील व्हिडीओ दाखवण्यात आला. साहजिकच प्रपत्ती आपण का करायची ते मनात परत ठसले गेले. हि प्रपत्ती - मग ती मंगलचण्डिका प्रपत्ती असो वा रणचण्डिका प्रपत्ती (महादुर्गेश्वर प्रपत्ती) हि प्रत्येक श्रद्धावानाला शौर्य प्रदान करते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यास समर्थ बनवते, हे बापूंचे शब्द कानात गुंजत होते, ह्यामुळे प्रपत्ती करताना आपण ती का करतो आहोत हे प्रत्येक क्षणी जाणवत होतं. अतिशय सुंदर पद्धतीने पवित्र वातावरणात संपूर्ण प्रपत्ती पार पडली.

"बं बं भोलेनाथ, बं बं भोले" हा गजर देखील अतिशय सुंदर व अनोख्या चालीत घेतला गेला, व प्रत्येक श्रद्धावानाने १२ प्रदक्षिणा झाल्यानंतर त्रिविक्रमाला फुले व अक्षता अर्पण करून लोटांगण घालून नमस्कार केला. प्रपत्ती च्या हॉल वर खूपच प्रसन्न वातावरण होते.
एवढ्या सुटसुटीतपणे सर्व गोष्टी मॅनेज करणाऱ्या ऑर्गनायझिंग टीम ला खूप अंबज्ञ, आणि प्रपत्ती सारखी एकत्र येऊन करण्याची जल्लोष करण्याची गोष्ट दिल्याबद्दल आपल्या लाडक्या बापुंना व मोठ्या आईला देखील खूप खुप अंबज्ञ !!!

..... शंतनुसिंह नातु

Monday, August 13, 2018

आग्नेय आशियातील भारतीय हिंदु संस्कृती

अक्षरशः हजारो मंदिरं, हजारो शिलालेख, हजारो शिल्पं, अनेक कागदपत्रं, हे सर्व आग्नेय आशियात पसरलेल्या भारतीय संस्कृतीचे पुरावे आहेत.

पण, आपलं #दुर्दैव इतकंच की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाला कोलंबस माहीत असतो, त्याने शोधलेली अमेरिका माहीत असते, अमेरिकेतली शहरं माहीत असतात, नेपोलियन माहीत असतो, वास्को-डी-गामा ही माहीत असतो. मात्र आपल्याच संस्कृतीला अभिमानाने मिरवणाऱ्या कंबोडियाची राजधानी माहीत नसते..! जावा-सुमात्रा, यवद्वीप, श्रीविजय, यशवर्मन, अंगकोर वाट.....वगैरे शब्द म्हणजे त्यांना ग्रीक किंवा हिब्रू भाषेतले शब्द वाटतात. कारण त्यांना कधी आपल्या विशाल सांस्कृतिक - धार्मिक साम्राज्याबद्दल सांगितलंच जात नाही..!

》》》》
दक्षिण – पूर्व (म्हणजेच आग्नेय) आशियात आपली #भारतीय_संस्कृती आजही ठळकपणे दिसते, जाणवते. मात्र भारतीय संस्कृतीचा प्रभाव या भागावर केंव्हापासून पडायला लागला याबद्दल नक्की माहिती कुठेच उपलब्ध नाही. काही शिलालेखांमधून माहिती मिळते. पण या भागात पहिला भारतीय माणूस केंव्हा आला, याचा पुरावा मिळत नाही.

■●■ कंबोडिया ■●■  (Cambodia)

कंबोडिया हा देश, भारतातून जमिनीच्या मार्गे, आणि समुद्रातूनही जाता येण्यासारखा देश आहे. भारताच्या पूर्वेला असणारा ब्रम्हदेश. त्याला लागून थायलंड आणि त्याच्या पुढे कंबोडिया. पूर्वी ‘कंबुज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या देशात भारतीयांचा प्रवेश कसा झाला याबद्दल एक कथा सांगितली जाते, जी ह्या भागात बरीच प्रचलित आहे.

}-------->        इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक #भारतीय काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ ला युध्द करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली. हा कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही #शिलालेख तेथे मिळाले आहेत. " अंगकोरवाट " ह्या जगप्रसिध्द मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिलं गेलंय –

कुलासीद भूजगेन्द्र कन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम I
कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्य्यार्थ पत्नीत्व मनायियापी II

》》》चिनी इतिहासकारांनी ह्या कौडिण्य बद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्यामुळे ही केवळ काल्पनिक कथा राहत नाही.《《《《

कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याचे चिनी नाव आहे, #फुनान_साम्राज्य. त्याचे हिंदू नाव उपलब्ध नाही. त्यामुळे जागतिक इतिहासात ते "फुनान साम्राज्य" या नावानेच ओळखले जाते. साधारण इसवी सन ६१३ पर्यंत हे फुनान साम्राज्य होते असे उल्लेख सापडले आहेत. या काळात, भारतातील अनेक युवक या साम्राज्यात स्थायिक झाले आणि त्यांनी स्थानिक नाग युवतींशी विवाह केले अश्या नोंदी सापडल्या आहेत. याच काळात, या भारतीयांनी आपले शेतीतील ज्ञान वापरून या साम्राज्यात कालवे खोदले आणि चांगल्या शेतीने देशात समृध्दी आणली. हे खोदलेले कालवे आजही #कंबोडिया वरून घेतलेल्या उपग्रह चित्रात स्पष्ट दिसतात.साधारण सातव्या शतकाच्या सुरुवातीला या फुनान राजवंशात अराजक निर्माण झाल्याने ‘कंबू’ नावाच्या, भारतातून तिथे गेलेल्या क्षत्रियाने शासनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेंव्हापासून हा देश कंबुज म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे याचेच ‘कंबोडिया’ झाले. या कंबुज वंशाने तीन/साडेतीन शे वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले. यांच्याच काळात भववर्मन, महेंद्रवर्मन यांच्यासारखे महापराक्रमी राजे निर्माण झाले.पुढे नवव्या शतकात, जयवर्मन(दुसरा) याने 'खमेर' साम्राज्याची स्थापना केली. त्याचा नातू यशवर्मन ने यशोधरपुर नावाची नवीन राजधानी स्थापन केली. याच वंशातील #सम्राट सूर्यवर्मन याने जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर,"अंगकोर वाट" बांधले.

👉      म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते पुढे हजार / बाराशे वर्ष, या विशाल साम्राज्यात हिंदू संस्कृती अत्यंत अभिमानाने आणि वैभवाने नांदली, बागडली. भारतापासून दूर, ह्या देशात सहाशे / सातशे वर्ष #संस्कृत ही #राजभाषा म्हणून मानाने मिरवली. सुमारे एक हजार वर्ष, वेदांच्या ऋचा ह्या देशात घुमल्या. मोठमोठे यज्ञयाग झाले. भव्य मंदिरं बांधली गेली. उपनिषदं, पुराण, #रामायण, #महाभारत, #गीता हे सर्व पवित्र ग्रंथ येथील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग झाले. #सामर्थ्यशाली, #वैभवशाली, #ज्ञानशाली असलेलं हे #हिंदूराष्ट्र; हजार, बाराशे वर्ष सुखा-समाधानाने नांदलं.
                    मात्र #आपण_इतके_करंटे, आपल्याला यातलं काहीही कधी कोणी सांगीतलं नाही की शिकवलं नाही..! युरोपच्या लहान, लहान देशांचा इतिहास – भूगोल पाठ करणारे आपण, आपल्याला आपलाच हा तेजस्वी इतिहास कळू शकला नाही..!!

■●■ इंडोनेशिया ■●■   (Indonesia)

▪♢▪ यवद्वीप ▪♢▪
जसं कंबुज देशाबद्दल, तसंच यव द्वीपाबद्द्ल. यवद्वीप म्हणजे जावा. आजच्या इंडोनेशियाचा एक भाग. कोणे एके काळी संपूर्ण हिंदू असलेला. अगदी रामायणात आणि ब्रम्हपुराणात उल्लेख असलेलं हे यवद्वीप. येथेही भारतीय नेमके केंव्हापासून आले, याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही. मात्र काही हजार वर्षांपासून येथे हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे हे निश्चित. जावा च्या लोकांची ही मान्यता आहे की ‘आजिशक’ ह्या भारतातून आलेल्या #पराक्रमी योद्ध्याने तेथील राक्षस देवतेच्या राजाला मारून, सामर्थ्यशाली राजवंश निर्माण केला.

▪♢▪ सुमात्रा ▪♢▪
जसे जावा, तसेच सुमात्रा. प्राचीन काळात #सुवर्णभूमि किंवा सुवर्णद्वीप म्हणून प्रसिध्द असलेला भाग. आजचं इंडोनेशियातलं सर्वात मोठं बेट. या बेटावर साधारण सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत हिंदूंचे ‘श्रीविजय साम्राज्य’ होते. अत्यंत वैभवशाली आणि संपन्न असलेल्या ह्या साम्राज्याबद्दल आधुनिक जगाला सन १९२० पर्यंत काहीच माहिती नव्हती, हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. १९२० मधे एका फ्रेंच संशोधकाने ह्या साम्राज्याची माहिती लोकांसमोर आणली. त्यानंतर मात्र ह्या साम्राज्याकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बऱ्याच माध्यमातून माहिती समोर येऊ लागली.
>>---->    इत्सिंग नावाचा चिनी बौध्द प्रवासी, #बौध्द धर्माचं अध्ययन करण्यासाठी सातव्या शतकात (इसवी सन ६७१ मधे) भारतातल्या नालंदा येथे जायला निघाला. मात्र तिथे अध्ययन करायचं असेल तर संस्कृत भाषा आवश्यक आहे ही माहिती त्याला होती. म्हणून तो चीनच्या ‘ग्वांझावू’ प्रांतातून निघून #श्रीविजय येथे थांबला आणि संस्कृत मधे पारंगत झाला. आपल्या एकूण २५ वर्षांच्या प्रवासात, इत्सिंग ने ६ ते ७ वर्ष श्रीविजय साम्राज्यात काढली. या साम्राज्याबद्दल इत्सिंग ने बरंच लिहून ठेवलंय.
>>---->   श्रीविजय साम्राज्याच्या काळातच त्रिमूर्ति प्रमबनन(‘परब्रम्ह’ चा अपभ्रंश) हे भव्य #हिंदू_मंदिर, जावा बेटावर इसवी सन ८५० मधे उभे राहिले. #दुर्गादेवी, #गणपती आणि अगस्त्य ऋषींच्या त्रीमूर्ती चे हे मंदिर अत्यंत भव्य असून आजही तिथे व्यवस्थित उपासना चालते..!

]====》जगातील सर्वात जास्त #मुस्लीम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आजही अत्यंत अभिमानाने आपल्या हिंदू खुणा मिरवतोय. याचं ‘दीपांतर’(समुद्रापलीकडला भारत) हे नाव आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. यांच्या नोटांवर(स्थानिक चलनांवर) श्री गणेशाचे चित्र असते. यांच्या विमानसेवेचे नाव ‘गरुडा एयरवेज’ आहे. ते बँकेला कोषागार म्हणू शकतात आणि त्यांच्या ‘बहासा इंडोनेशिया’ या अधिकृत भाषेत सत्तर टक्के संस्कृत शब्द येतात. इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोधवाक्य ‘भिन्नेका तुंगल इका’ (विविधतेत एकता) हे आहे.

]====》इंडोनेशियातलं बाली द्वीप हे निसर्ग सौदर्यानं नटलेलं विख्यात पर्यटन स्थळ आहे. आजही बाली ची ९०% लोकसंख्या हिंदू आहे आणि हिंदू आचार - विचारांवरच जगतेय. बालीत आढळलेला पहिला हिंदू शिलालेख #ब्राम्ही लिपीत आहे आणि तो इसवी सनाच्या १५० वर्षांपूर्वीचा आहे.

■●■ व्हिएतनाम ■●■  (Vietnam)

व्हिएतनाम या देशाला आपण ओळखतो ते एक कम्युनिस्ट राष्ट्र, ज्याने सत्तर च्या दशकात अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नमविले. मात्र हे व्हिएतनाम, कोणे एके काळी पूर्ण हिंदू राष्ट्र होतं. या देशाचं नाव तेंव्हा ‘चंपा’ होतं आणि याचे पाच प्रमुख विभाग होते –

1. इंद्रपुर
2. अमरावती (चंपा)
3. विजय (चंपा)
4. कौठर
5. पांडुरंग (चंपा)

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढे जवळपास एक हजार वर्ष हा देश हिंदू आचार, विचार वागवत समृध्द होत होता. श्री भद्रवर्मन, गंगाराज, विजयवर्मन, रुद्रवर्मन, ईशानवर्मन सारख्या महापराक्रमी राजांनी हा देश भरभराटीला आणला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात सुरुवातीला भद्रवर्मनचा मुलगा गंगाराज याने सिहांसनाचा त्याग करून जीवनाची शेवटची वर्षे भारतात येऊन #गंगा किनारी व्यतीत केली. पुढे पांडुरंग वंशाने बरीच वर्षे राज्य केले.या संपूर्ण कालावधीत, ‘चंपा’ च्या इतिहासात, भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने राबविली गेली. भारतीय पध्दती प्रमाणे सेनापती, पुरोहित, पंडित वगैरे रचना होती. महसूल व्यवस्था ही भारताप्रमाणेच ठेवण्यात आली होती. मंदिरं भव्य नव्हती, पण कलात्मक होती. यज्ञ, याग, अनुष्ठानं मोठ्या प्रमाणात व्हायची. भारतीय ग्रंथ, पुराण यांना विशेष महत्त्व होतं. या ‘चाम’ संस्कृतीचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत, जे ‘चम’ या नावाने ओळखले जातात. मुळात ही ‘चम’ म्हणजे हिंदू रीतीरिवाज पाळणारी माणसं आहेत. कंबोडिया आणि व्हिएतनाम या दोन देशात ह्या ‘चम’ लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळालेला आहे.

■●■ लाओस ■●■  (Laos)

लाओस हा देश ही एकेकाळी हिंदू संस्कृतीला मानणारा देश होता. लाओसच्या इतिहासात पहिल्यांदा उल्लेख होणारा हिंदू राजा होता, श्रुतवर्मन. याने वसवलेली राजधानी होती, श्रेष्ठपुर. सर्व हिंदू उत्सव लाओसमधे अत्यंत उत्साहाने आणि भव्यतेने साजरे व्हायचे. आजही लाओस आणि व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या शेजारच्या देशांमध्ये हिंदू पद्धतीचे कॅलेंडर चालते. #बुध्दीस्ट कॅलेंडरमधे भारतीय महिने (चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ....) असतात आणि या भागातल्या अनेक देशांमध्ये हे कॅलेंडर चालते.

]====》गंमत म्हणजे आपल्या वर्षप्रतिपदेच्या (गुढीपाडव्याच्या) वेळेसच लाओसचा नवीन वर्षारंभाचा उत्सव असतो आणि संपूर्ण लाओसमध्ये तो अक्षरशः प्रत्येक घरात साजरा केला जातो..!

■●■ थायलंड ■●■  (Thailand)

पूर्वीचे सयाम म्हणजे आजचे थायलंड. या सयाम देशातही एक अयोध्या (त्यांच्या भाषेत ‘अयुथ्या’) आहे आणि त्यांना तीच मूळ #अयोध्या वाटते. येथे प्रभू रामाचा प्रचंड प्रभाव आज ही आहे. थायलंड चे राजे स्वतः ला रामाचे वंशज म्हणवून घेतात. बँकॉक मधील प्रमुख रस्त्यांच्या नावात सुध्दा ‘राम’ आहे.

■●■ सिंगापुर ■●■  (Singapore)

सिंगापुरचं मूळ नावच मुळी ‘सिंहपुर’ आहे. स्वतः सिंगापुरकरांनाही याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अधिकृत गाईड मधे तसा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वीच्या सिंहपुरात संस्कृतचा वापर कसा व्हायचा हे ही सिंगापुर सरकार अभिमानाने सांगते. सिंहपुर हे नाव असल्यानेच सिंगापुर ने "सिंह" ही स्वतःच्या देशाची खुण म्हणून स्वीकारली आहे.

■●●○●●■
एकुणात काय, तर हा संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया सुमारे हजार – बाराशे वर्ष हिंदुत्वाची सूक्तं गात होता. हिंदू पद्धतीनं जीवन यापन करत होता. भव्य आणि कलात्मक मंदिरं उभारत होता. यज्ञ-याग करत होता. देवाला आळवत होता. वेद, उपनिषद, पुराण यांच्या ऋचांनी आसमंत भारून टाकत होता. जगाला शांततेचे संस्कार देणारी हिंदू आणि बौध्द संस्कृती, त्या सर्व देशांना सुख समाधानाने, शांतीने जगायला शिकवत होती..!

■●●○●●■
या सर्व प्रवासात भारताने आपली वर्णव्यवस्था तिथे नेली नाही. आपली खाद्यसंस्कृती त्या देशांवर लादली नाही. त्या देशांना आपल्या #वसाहती समजल्या नाही. व्यापारासाठी त्या देशांना वेठीला धरलं नाही. तिथल्या लोकांना तुच्छ लेखलं नाही. तिथे कुठेही युध्द करून त्यांना जिंकलं नाही..!

■●●○●●■
हे सर्व फार महत्वाचं आहे, कारण पुढे सहाशे – सातशे वर्षानंतर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेनिश या लोकांनी आशिया खंडात ज्या वसाहती उभारल्या, त्यांत वरील पैकी एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही..!

■●●○●●■
आपलं दुर्दैव इतकंच, की ह्या वैभवशाली, उदात्त आणि अभिमानास्पद इतिहासाविषयी आम्हाला काहीही माहिती नाही आणि आजवर आपल्या राज्यकर्त्यांनी हा हिंदू इतिहास जनतेला माहिती करून देण्याची इच्छाही दाखवली नाही..!!

(वॉट्सएप्प वरील मेसेज)

Thursday, August 2, 2018

Dattabavani (दत्तबावनी) with meaning

दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि.मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ

                  *दत्तबावनी*

*जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||*
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

*अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||*
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

*ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||*
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

*अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||*
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

*झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||*
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

*क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||*
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

*आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||*
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

*सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||*
*दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||*
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

*किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||*
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

*विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||*
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

*जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||*
*विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||*
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

*एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||*
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

*दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||*
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

*बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||*
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

*एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||*
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

*दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||*
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

*जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||*
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

*स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||*
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

*पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||*
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

*करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||*
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

*शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||*
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

*जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||*
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

*करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||*
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

*वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||*
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

*झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||*
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

*ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||*
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

*पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||*
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

*हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||*
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

*निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||*
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

*एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||*
*संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||*
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

*यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||*
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

*रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||*
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

*तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||*
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

*अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||*
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

*आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||*
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

*मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||*
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

*डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||*
*नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||*
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

*करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||*
*सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||*
*दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||*
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

*बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||*
*यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||*
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

*अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||*
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

*सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||*
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

*वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||*
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

*थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

*अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||*
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

*तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||*
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन *‘जय जय श्री गुरुदेव’* म्हणावे

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥