तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात कारण भगवान #त्रिविक्रमाचे रुप प्रत्यक्ष पाहणे हे फक्त सत्ययुगातच शक्य असते.तुम्हाला ते त्रेतायुगात प्राप्त झाले आहे ह्यापुढील काळात '#श्रीराम 'रुपाने त्रिविक्रमाचे एक स्वरूप वसुंधरेवर चालेल, वावरू, कार्य करेल.नंतर व्दापारयुगात अशाच प्रकारे स्वंयंभगवानाचे 'श्रीकृष्ण 'रुप वसुंधरेवर लीला करेल. परंतु श्रीराम व श्रीकृष्ण ह्यांचे मूळरुप ओळखणारे लोक तेव्हाही अगदी थोडेच असतील.
मात्र कलियुगाच्या अंतिम चरणाच्या सुरुवातीला श्रीराम व श्रीकृष्ण ह्याचे एकत्रित स्वरुप, एकरुप व संयुक्त भाव घेऊन स्वयंभगवान त्रिविक्रम श्रद्धावानांसमोर उकलून दाखविला जाईल त्याचे नाम, रुप व कार्य सर्व श्रद्धावानांना पाहता येईल. का कारण कलियुगाचा अंतिम चरण'मत्स्य युग' हे नाम धारण करून सुरू झाल्यानंतर दोन पर्याय उरतील.
१)जगातील अनाचार अधिकाधिक वाढतच गेला व भक्ती क्षीण झाली, तर मग फक्त अडीच हजार वर्षेच उरतील व त्यानंतर प्रलय होईल आणि प्रलयानंतर परत सर्व अभक्त मानव पुन्हा प्राणियोनीत जन्म घेऊन ८४लक्ष योनीचा प्रवास करीत करीत अर्थात सतत दु:खे भोगत भोगत पुन्हा मानव बनतील. आणि तेसुद्धा आधील युगातील आपापली पापे बरोबर घेऊनच -अर्थात अशा अभक्तांना त्या नवीन कल्पात सत्ययुग, त्रेतायुग व व्दापारयुगात जन्मच मिळणार नाही - थेट काळ्या कलियुगात मानव म्हणून प्रवेश मिळेल.
२)परंतु भगवान त्रिविक्रमाला असे व्हावयास नको आहे
आपल्या भक्तांना तरी अधिक चांगली संधी मिळावी,असे त्याला मनोमन वाटते आणि म्हणून त्याने जगदंबेची तपश्चर्या करून हा दुसरा पर्याय तयार केला आहे.
हा दुसरा पर्याय म्हणजे जे जे कुणी हातून चुका घडत असताना सुद्धा,दु:खात व सुखातही स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर करत राहतील,त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतील, त्याच्या चरणांशी घट्ट बांधून घेतली आणि त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा अधिकाधिक प्रयास करतील, त्यांना आणि फक्त केवळ त्यांना भगवान त्रिविक्रम त्या प्रलयातून स्वतः वाचवेल - ह्यासाठी संनिहिताच नौका बनेल.
बाकीचे सर्व प्रलयात नष्ट होतील. परंतु निसर्ग नष्ट होणार नाही आणि त्रिविक्रमाचे भक्त थेट कलियुगाच्याच पुढील भागात प्रवेश करतील व तो भाग अडीच लाख वर्षे इतका असेल आणि त्या अडीच लाख वर्षामध्ये ह्या प्रलयातून वाचलेल्या त्रिविक्रमभक्तांना त्यांची गतजन्मातील सर्व पापे माफ केलेली असतील आणि त्यामुळे ते सर्वजण पुढील प्रत्येक जन्मात अत्यंत सुखाने, आनंद करीत, एकही रोग न होता, एकही संकट न येता फक्त यश आणि यशच मिळवत राहतील आणि मग महाप्रलयानंतर स्वयंभगवानाच्या साकेतलोकामध्ये आणि अर्थात भर्गलोकामध्येही सुखाने कालक्रमण करतील -त्यांना त्यानंतरच्या युगामध्ये फक्त प्रारब्ध-हीन जन्म मिळेल अर्थात भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या लीलेत निकटचे सहकारी बनण्यासाठी व इतरांना सन्मार्गावर आणण्यासाठी. आणि हा दुसरा पर्यायच आपल्या भक्तांना मिळावा ह्यासाठीच त्रिविक्रम कलियुगाच्या मत्स्ययुगापर्यत स्वतःचे स्वरुप कलियुगात झाकून ठेवील आणि मागील जन्मांमध्ये ज्याने त्रिविक्रमाची भक्ती केली आहे, त्यांनास्वतः कडे आकर्षित करुन घेईल आणि त्यांच्याकडून हा मंत्रगजर करवून घेईल.
लक्षात ठेवा! त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू शकत नाही -पापही आणि पुण्यही. (तुलसी पत्र १५१६)
No comments:
Post a Comment