अँटी व्हायरस.....
लँपटाँप घेताना मला सांगण्यात आले की त्याच्यावर अॅन्टीव्हायरस प्रोग्राम टाकून घे... देणारा माझा मित्रच होता...मी विचारले याची आवश्यकता का?
त्याने उत्तर दिले की आपला लॅपटॉपला आपण मोबाईल जोडतो किंवा मेमरी कार्ड जोडतो. कदाचित इंटरनेटचा वापर करताना सर्फिंग करताना अनेक हार्मफुल साईट्स असतात, छुपे व्हायरस असतात जे आपल्या नकळत आपल्या पी सी मधे येतात व सिस्टीम बिघडवतात.
मी विचारले समजा लॅपटॉप कशालाच जोडला नाही तर मग कसे येतील?
त्याने सांगितले की जोडावा तर लागतोच व समजा जोडला नाहीच तरी काही काळाने अनावश्यक फोल्डर वगैरे तयार होतात ते काढून टाकावे लागतात. काही प्रोग्राम अपडेट करावे लागतातच अपरिहार्य पणे जोडावा लागतोच. आपल्या नकळत व्हायरस येऊ शकतात. त्यासाठी अँटीव्हायरस असावाच व रोज अथवा ठराविक दिवसांनी पीसी स्कॅन करावा.
मी सर्व ऐकले व समजून घेतले...
वर वर अतिशय कॉमन दिसणारी ही गोष्ट मला बरंच शिकवून गेली...
एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे.
मी थोडा असा विचार केला...
जर एखादा छोटा लॅपटॉप ज्याची हार्ड डिस्क फार तर 512 जीबी वगैरे असते व तो इतरत्र कनेक्ट झाला तर हार्मफुल प्रोग्राम येतात व सिस्टीमवर हल्ला करतात.
मग मानवी मेंदू तर त्यातुलनेत प्रचंड मोठा आहे. तो ही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो हार्मफुल साईट्स अर्थात जागा जसे की स्मशान, काही दुषीत जागा, बाधीक व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती वगैरे च्या संपर्कात आपण जातो.
मग आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये (दोष येऊ नये आपले तेजोवलय दुषीत होऊ नये) म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो?
उत्तर समोरच होते...
आपण म्हणणारे स्तोत्र मंत्रजप हे आपले अँटीव्हायरस... मंत्रांचा अर्थ समजला काय व न समजला काय... कॉम्प्युटरचे अँटी व्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला?
पण ज्याला समजते त्याने सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो... समजो अथवा न समजो ते काम तर व्यवस्थित होते.
मंत्र स्तोत्रांचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे... व्हायरस आपोआप जातात...
जसे सतत ऑनलाईन राहून काम करणारे जे पी सी असतात त्यांना स्ट्राँग अँटी व्हायरस लागतो... तसेच विशेष साधना करणार्या साधकांना विशेष न्यासोक्त कवच असावच लागतं.
एव्हाना पी सी व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्र मंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल...
त्या क्षेत्रातील तज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा एवढंच आपण करत रहावं मग चिंता नाही.
आणि दुर्लक्ष करत गेलो तर एकवेळ अशी येते की फॉर्मेट करावं लागतं पण शरीराला, मनाला फॉर्मेट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी....
शेवटी काय?...
रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ, नित्यसेवा हार्मफुल साईट्सला भेट देताना आपलं संरक्षण, शुचिर्भूतता सांभाळली की आपलं शरीर, मन नक्कीच छान सुरक्षित राहील.
...... लेखक कोण माहिती नाही, पण खूप छान लेख...
..... (व्हॉट्सअप वरुन)
No comments:
Post a Comment